ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ‘नेट कॅफे’ चालकांकडून सर्रास लूट
वणी (यवतमाळ), २८ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे, तसेच आरक्षण असलेल्यांना जात आणि जातवैधता प्रमाणपत्र पोचपावती अर्जासमवेत जोडणे आवश्यक आहे.
याचाच अपलाभ घेत उमेदवारांकडून या सर्व प्रक्रियेतील संगणकीय कामासाठी अधिक पैसे आकारत ‘नेट कॅफे’ चालकांनी लूट चालवली आहे. प्रति उमेदवार १ सहस्र रुपये आकारणी केली जात आहे.