माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले ! – देवेंद्र फडणवीस, भाजप
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील तरतुदी नवीन कृषी कायद्यात आहेत. नवीन कृषी कायद्याने पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले आहे. राजकीय दुकानदारीसाठी या कायद्याला महाविकास आघाडीकडून विरोध होत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते २७ डिसेंबर या दिवशी ईश्वरपूर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय झाले की अन्य राजकीय पक्षांच्या पोटात का दुखतं हा मोठाच प्रश्न आहे. आपली राजकीय दुकानदारी बंद होऊ नये,म्हणून अनेक नेते अस्वस्थ आहेत.
(किसान आत्मनिर्भर यात्रा समारोप,इस्लामपूर । दि.27डिसेंबर2020)#KisanAtmanirbharYatra#FarmersWithModi#ModiWithFarmers pic.twitter.com/emqpn3khKL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 28, 2020
फडणवीस पुढे म्हणाले, केंद्राचे तिन्ही कायदे शेतकर्यांच्या हिताचे आहेत. अडते, दलाल यांच्या पाशातून शेतकरी आता मुक्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा या कायद्याला समर्थन दिले होते. त्यांनी याविषयी कृषी विभागाच्या अधिकार्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी हा कायदा शेतकर्यांच्या कसा लाभाचा आहे याविषयी प्रबोधन करण्याचे आदेश दिले होते; मात्र काहींची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून याला विरोध करण्यात आला.