संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप
मुंबई – ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’चे ५ सहस्र ४०० कोटी रुपये चोरले आहेत. ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि प्रवीण राऊत यांच्या परिवाराचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक संबंध आहेत. प्रवीण राऊत आणि संजय राऊत या कुटुंबाचे आर्थिक संबंध आहेत. या दोघांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. हा पैसा कुठून आला ? याचे अन्वेषण व्हायला हवे, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी २९ डिसेंबर या दिवशी ‘ट्वीट’द्वारे केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी वरील वक्तव्य केले आहे.
I heard about ED notice to Sanjay Raut Family. Will Mr Raut tell us, is his family beneficiary? Whether earlier any inquiry, notices received? 10 lacs Depositors r sufferers. If ED wants any information
Political Protection is not healthy idea.
All wants revival of PMC Bank. pic.twitter.com/PUqGUDL3pC
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 27, 2020