गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

चित्रीकरण करून व्हिडिओ काढला; मात्र बचाव केला नाही  !

  • ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी संघटित होऊन कृती न करणारी जनता पुढे मोठ्या आपत्काळात एकमेकांना कधीतरी साहाय्य करू शकेल का ?
  • अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही, याचा विचार सरकार आणि पोलीस प्रशासन यांनी करायला हवा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे भर रस्त्यात २ व्यक्तींकडून तरुणाची हत्या करण्यात येत असतांना रस्त्यावर असणार्‍या लोकांनी ही हत्या रोखण्याऐवजी एकाने त्याचे चित्रीकरण केले आणि त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. तरुणावर आक्रमण झाल्यानंतर तो घायाळ अवस्थेत असतांनाही लोकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले नाही. या तरुणाचे अजय असे नाव आहे.

अजयचा भाऊ संजय याने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी या वेळी त्यांना तडजोड करण्यास सांगितले होते. फुलांच्या दुकानावरून संजय आणि मुख्य आरोपी गोविंद यांच्यात वाद होता. गोविंद आणि त्याचा मित्र अमित यांनी अजयवर आक्रमण करून त्याची हत्या केली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.