सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
मुंबई – सौ. वर्षा राऊत यांचा अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात अन्वेषणासाठी जाण्याचा कालावधी ५ जानेवारीपर्यंत वाढवून मागितला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वेळी संजय राऊत म्हणाले, ‘‘आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.’’