पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ
सोलापूर येथे पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
सोलापूर – विजापूर वेस भागातील कुरेशी गल्लीमध्ये हत्येसाठी आणलेल्या गोवंशांना सोडवण्यासाठी गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने प्रयत्न केला; मात्र तेथील कसायांनी पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, असे अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. कसायांकडून दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण झाले याचा अर्थ कसायांना कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी, अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे.
१. येथील कुरेशी गल्लीमध्ये हत्येसाठी आणलेले गोवंश एका घरात कोंबून ठेवले असल्याची गोपनीय माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करून पोलिसांच्या साहाय्याने कुरेशी गल्ली येथे धाड टाकली असता तिथे एका घरात १० गायी हत्या करण्यासाठी बांधलेल्या आढळून आल्या.
!! #जय_श्रीराम !!
#विजापुर_वेस_भागात_पोलिसांच्या_मदतीने #कत्तलखानावर_छापा_5_गोवंश_जप्त
गुप्त माहिती नुसार विजापुर वेस…Posted by अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ सोलापूर on Friday, December 25, 2020
२. पोलिसांनी चौकशी चालू केली असता तेथे ६० ते ७० कसाई एकत्र येऊन पोलिसांना धक्काबुक्की करून गोरक्षकांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी गोरक्षकांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानुसार गोरक्षक तेथून जात असतांना कसायांनी त्यांचा पाठलाग करून गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांच्यावर आक्रमण केले. त्यातून वाचण्यासाठी बहिरवाडे एका हिंदू व्यक्तीच्या घरामध्ये घुसल्याने ते या आक्रमणात बचावले.