कॉलसेंटरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक
लाखो रुपये घेऊन आरोपी पसार
सोलापूर – कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात १६ डिसेंबर या दिवशी फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यामध्ये कसबे याने कॉलसेंटरसाठी नोकरीस आलेल्या युवक-युवतींकडून प्रारंभी कामावर घेण्यासाठी १ सहस्र ७०० रुपये प्रतिव्यक्तीकडून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून ३ ते ४ मास काम करवून घेतले. त्यांना मानधन न देता कॉलसेंटर मालकाने आस्थापनाला टाळे ठोकून पोबारा केला आहे. यामध्ये शेकडो युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.