लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल

लातूर – मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

 (सौजन्य : Zee 24 Taas)

केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनीही हा ऐतिहासिक क्षण ट्वीट केला आहे.

या प्रकल्पामुळे ५ सहस्र जणांना थेट आणि १० सहस्र लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या काळातही रेल्वे विभागाने वेगात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.