भीमा नदीपात्रात सापडली भगवान शंकराची पुरातन मूर्ती
दौंड (जिल्हा पुणे) – येथील भीमा नदीपात्रातील २८ मोर्यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे. नगर रेल्वे लोहमार्गासाठी मागील १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पुलाच्या बाजूला दुसर्या रेल्वे पुलाच्या पायाभरणीचे काम चालू आहे. या ठिकाणी खोदकाम करतांना एका खड्डात ही मूर्ती सापडली.
स्थानिकांच्या मते ही मूर्ती पाण्यात वाहून आलेली आहे; मात्र मूर्तीचे वजन अधिक असल्याने ती याच ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी दिली आहे. सध्या मूर्तीचा तोंडवळा सापडला असून याच परिसरात अन्य अवशेष सापडण्याची शक्यता आहे.