ऊर्जेसाठी श्री महालक्ष्मीदेवीचे आशीर्वाद घेण्यास येतो ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
कोल्हापूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२० हे सर्वांसाठीच अडचणीचे ठरले आहे. आता नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आईचे दर्शन घेतले आहे. जेव्हा कधी ऊर्जेची आवश्यकता असते, तेव्हा आशीर्वाद आवश्यक असतो, त्या वेळी आशीर्वाद घेण्यासाठी मी येतो, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे आशीर्वाद घेतले त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. देवीचे आशीर्वाद घेऊन झाल्यावर फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा भेट देण्यात आली. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य राजू जाधव, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांसह अन्य उपस्थित होते.