देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून त्या देवतांचे नामजप करून घ्यावे !
‘कर्नाटक राज्यात नरकचतुर्दशीच्या दिवशी ऑनलाईन’ सत्संगात सर्व धर्मप्रेमींकडून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करून घेतला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. काही धर्मप्रेमींना अनुभूती आल्या. काही धर्मप्रेमींचे ध्यान लागले आणि त्यांना आनंद मिळाला. त्यांना नामजपाची गोडी लागली. काही धर्मप्रेमींनी प्रतिदिन नामजप करण्याचा निश्चय केला. बर्याच धर्मप्रेमींनी कुटुंबियांसह वैखरीतून नामजप केला.
‘ऑनलाईन’ ‘नामजप सत्संगा’त दर्शकांकडून १५ मिनिटे भगवान श्रीकृष्णाचा नामजप करवून घेतो. बर्याच जणांनी सांगितले, ‘‘नामजप केल्याने मनाला शांत वाटते. काहींनी सांगितले, ‘‘घरातील वातावरण पालटले. वाद, कटकटी बंद झाल्या आणि घरात शांत वाटत आहे.’’ अशा प्रकारे दर्शकांनी नामजप केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या देवतांचे नामजप करून घेऊ शकतो, जसे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘श्रीरामा’चा. २९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती आहे. त्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेऊ शकतो.
‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून विशिष्ट दिवशी त्या देवतांचे नामजप करून घेतल्यास त्यांनाही चांगले वाटेल आणि ते आपल्या कार्याशी जोडून रहातील. ‘ऑनलाईन’ सत्संगात प्रथम ५ मिनिटे नामजपाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर २० मिनिटे धर्मप्रेमींकडून सामूहिकरित्या नामजप करवून घेऊ शकतो आणि शेवटची ५ मिनिटे धर्मप्रेमींना नामजप करतांना आलेल्या अनुभूती सांगण्यासाठी दिली. याप्रमाणे ३० मिनिटांचे नियोजन आपण करू शकतो.’
– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, जळगाव सेवाकेंद्र (५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |