अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
मुंबई – भाजपच्या विरोधात बोलणार्यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला महाराष्ट्र शासनाच्या अनुमतीविना महाराष्ट्रात अन्वेषण करता येणार आहे, असा नियम करण्यात आलेला आहे. अंमलबजावणी संचालनालयाला अधिकार आहेत; मात्र त्याच्या अधिकाराचा उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही, असे वक्तव्य महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालयाकडून देण्यात आलेल्या नोटिसीविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले.