अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण करून विकणार्या मदरशाच्या मौलानाला अटक
हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्याची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
नवी देहली – १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी मदरशातील शिक्षक असणार्या ४५ वर्षीय मौलाना नौशाद याला अटक केली आहे. तो या मुलीला विकण्याच्या सिद्धतेत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली. उत्तरप्रदेशातील हरदोई येथे अनेक मुलींचे अपहरण आणि लैंगिक शोषण केल्याचे १० हून अधिक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.