भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !
जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती !
भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्चित !
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील बदलापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार रमेशचंद्र मिश्रा यांनी हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाच्या सोहळ्याला त्यांना आमंत्रण न दिल्याने आणि कार्यक्रमस्थळावरील फलकावरही नाव नसल्याने कार्यक्रमस्थळी जाऊन तेथे पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या आसंद्या लाथेने उडवून दिल्या. याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
(सौजन्य : MIRROR NOW)
रमेशचंद्र मिश्रा कार्यक्रमस्थळी येऊन, लोकांना दटावणीच्या स्वरात ‘येथे काय चालू आहे ?’ अशी विचारणा करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. स्थानिकांनी येथे हुतात्मा स्मारकाचे भूमीपूजन असल्याचे सांगितल्यावर मिश्रा संतप्त झाले. ‘स्थानिक आमदार असूनही मला का बोलावले नाही ?’ अशी त्यांनी विचारणा केली. ‘मतदारसंघात पायाभरणीचा कार्यक्रम होतो, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीचे नाव भूमीपूजन फलकावर असले पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे मी याची तक्रार करणार’, असे म्हणत मिश्रा तेथून निघून गेले.