हिंदु धर्माची बाजू मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’सारखे दुसरे दैनिक होणे नाही ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली), २७ डिसेंबर (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण केव्हापासून चालू होणार आहे ? हिंदु धर्माची बाजू मांडणारे असे दैनिक दुसरे होणे नाही, असे गौरवोद्गार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. २६ डिसेंबर या दिवशी ते मांगले (तालुका शिराळा) येथे आले असता दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. भरत जैन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले. ‘२८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) अशा होणार्या गडकोट मोहिमेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे’, असे आवाहन पू. भिडेगुरुजी यांनी केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भारती जैन, शिवसेनेचे श्री. नीलेश आवटे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री संदीप चौगुले, दर्शन जोशी, अवधूत माजगावकर, विक्रांत पवार, शिवराज आवटे उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासाठी सौ. भारती जैन यांनी पू. भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद घेतले.