अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड
देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोपधर्मांध अधिवक्ता झाले, तरी गुन्हेगारी कृत्य करतात, असेच यातून लक्षात येते ! |
नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने प्रसिद्ध अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर धाड टाकली. देहली दंगलीतील एका आरोपीला जामीन मिळण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Court asks for footage of police raid on lawyer appearing in riots cases
(report by @RichaBanka)https://t.co/GsgS2cV1er pic.twitter.com/3r7QHTcfNZ
— Hindustan Times (@htTweets) December 26, 2020
तसेच त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.