कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।
कृष्णा, असा काय गुन्हा घडला ।
म्हणून तू कोरोना दिला ॥ ध्रु.॥
हवा-पाणी तूच दिलेस ।
संपूर्ण सृष्टीला तूच जगवतोस ॥
अचानक कसा कोप घडला ।
कोरोनासारखा रोग दिला ॥ १ ॥
कृष्णा, सध्या बासरी ठेव खाली ।
कोरोनाला दे मूठमाती ।
तुझी जगावरी सत्ता ।
उशीर लावू नकोस आता ॥ २ ॥
संकट आले पृथ्वीवरी ।
त्वरित ये सत्वरी ।
हे गिरिधारी, तू दयाळू असता ।
असा कसा तुझा कोप झाला ॥ ३ ॥
सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा ।
हेच मागणे करतो हा दास सुधा ॥ ४ ॥
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |