विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्यास निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा पोलिसांनी रोखली
सांगली – ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याची देणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली. केंद्र शासनाने आणलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यात २५ डिसेंबर या दिवशी आत्मनिर्भर यात्रा चालू केली. या यात्रेचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईश्वरपूर येथे २७ डिसेंबर या दिवशी झाला. तेथील सभेत या कोंबड्या सोडण्यात येणार होत्या.