किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

गुरुकृपायोगाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘जगातील सहस्रो साधक, हिंदु धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी, संत, ऋषिमुनी आणि देवीदेवता हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणगान करून कृतज्ञता व्यक्त करत आहेत, तसेच त्यांची महानता आणि अवतारी कार्य शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. 

पू. शिवाजी वटकर

काय सांगू देवा, परम पूज्यांची (टीप १) कीर्ती ।
साधकजन, देवीदेवता, संत गुणगान गाती ॥ १ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांच्या गुरुतत्त्वाची ख्याती ।
‘गुरुकृपायोगा’ची (टीप २) निर्मिती करिती ॥ २ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची शिवस्थिती ।
साधकांचे ‘स्वभावदोष नि अहं’ यांचा लय करिती ॥ ३ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची महती ।
मजसम पामरामुखी देवतेचे ‘नाम’ बोलविती ॥ ४ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची स्वरूपस्थिती ।
कलियुगातील जिवांना ‘सत्संगा’ला लावती ॥ ५ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची विष्णु अवतारी कीर्ती ।
मजसम साधकाकडून राष्ट्र नि धर्माची ‘सेवा’ करवूनी घेती ॥ ६ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची आध्यात्मिक श्रीमंती ।
मजसम दरिद्य्राकडूनही ‘त्याग’ करवूनी घेती ॥ ७ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची प्रीती ।
मजसम स्वार्थ्यालाही ‘निरपेक्ष प्रेम’ करायला लाविती ॥ ८ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची ज्ञानशक्ती ।
कलियुगी ग्रंथगंगा नि काव्यगंगा अवतरती ॥ ९ ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची ज्ञानोत्तर भक्ती ।
‘मोक्षगुरु’ असूनी, स्वतःला ‘शिष्य’ (टीप ३) म्हणविती ॥ १० ॥

काय सांगू देवा, परम पूज्यांची धर्मसंस्थापनेची महती ।
हिंदु राष्ट्राचे उद्गाते होऊनी, जगदोद्धार करिती ॥ ११ ॥

किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।
साधकजन, देवीदेवता, संत, महर्षि त्यांच्या चरणी नतमस्तक होती ॥ १२ ॥

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी सांगितलेला साधनामार्ग
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले आद्य शंकराचार्यांच्या उज्ज्वल गुरु परंपरेतील ‘मोक्षगुरु’ असतांना त्यांनी त्यांच्या ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथात स्वतःचा उल्लेख ‘शिष्य’ असा केलेला आहे.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक