अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे पार पडली युवासेनेची आढावा बैठक
अकलूज (जिल्हा सोलापूर), २७ डिसेंबर (वार्ता.) – सोलापूर जिल्हा युवासेना पंढरपूर विभाग कार्यक्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची अकलूज येथे आढावा बैठक पार पडली. कार्यक्रमाच्या वेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य रूपेश कदम यांनी युवासेना हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण केले आणि कार्यक्षेत्रातील सामाजिक अडचणींसाठी स्वतंत्र ८८८८७२४५४५ हा क्रमांक देऊन कार्यपद्धत सांगितली, तसेच ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पनाही सांगितली. या वेळी कदम यांनी आगामी तीन मासांमध्ये कार्यकर्त्यांना शासकीय योजनांसाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यास सांगितले. या वेळी युवासेनेचे तालुका, उपतालुका, शहर येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
१. युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवलकुमार गाडे यांनी केले, तर आभार चंद्रकांत देवकर (सर) यांनी मानले.
२. युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी युवासेनेच्या कामाचा आढावा देऊन नवीन पदाधिकारी निवडी लवकर करण्यासाठी विनंती केली, तसेच आपले विचार व्यक्त करून मान्यवरांना शिवनेरी तालिमीची ओळख करून देत लोकनेते दत्ता आप्पा वाघमारे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
३. या वेळी कार्यक्रमामध्ये उदय पोपट कांबळे यांचा भगवा झेंडा देऊन शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आला. या बैठकीला युवासेना सहसचिव तथा विस्तारक विपुल पिंगळे हेही उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, युवा सेना जिल्हा युवाअधिकारी महेश देशमुख, माळशिरस तालुका प्रमुख नामदेव (नाना) वाघमारे, सांगोला तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, मंगळवेढा तालुकाप्रमुख तुकारामजी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
४. या वेळी दत्ताजी गोरे, प्रसाद भांगे, शंकर मेटकरी, नवलकुमार गाडे, सुभाष भोसले, दीपक कसगावडे, प्रशिक्षक जयसिंग बांडगर (सर), प्रताप सरगर, अचल गांधी, रणजित गायकवाड, साई जाधव, फारूख शेख, इक्बाल मुलाणी यांच्यासह युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.