उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक करणार्या धर्मांधाचे अवैध घर पालिकेकडून उद्ध्वस्त !
हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी अर्पण गोळा करण्यासाठी फेरी काढली होती. त्यावर येथील बेगमबाग या मुसलमानबहुल भागात दगडफेक करण्यात आली, तसेच काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
Madhya Pradesh: Police and municipal teams demolished house in Ujjain’s Begum Bagh from where women and children threw stones on Ram Yatra taken out on Friday to collect funds for temple construction in Ayodhya pic.twitter.com/DU3eBaNZA7
— Free Press Journal (@fpjindia) December 26, 2020
या घटनेनंतर पोलिसांनी आणि नगरपालिकेच्या पथकाने ज्या घराच्या छतावरून महिला आणि लहान मुले यांनी दगडफेक केली, ते घर कारवाई करून पाडून टाकले. हे घर अवैधरित्या बांधण्यात आले होते.