उत्तरप्रदेशात एका मासात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत ३५ जणांना अटक !
एका राज्यात केवळ एका मासात ३५ जणांना अटक होते, याचा अर्थ हे लोण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे लक्षात येते. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशस्तरावर असा कायदा करून हिंदु तरुणींना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात २७ नोव्हेंबरला लव्ह जिहादविरोधी कायदा संमत करण्यात आल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी गेल्या मासाभरात १२ गुन्हे प्रविष्ट करून ३५ जणांना अटक केली आहे.
#UttarPradesh police have made more than one arrest a day since the controversial anti-conversion ordinance came into effect a month ago, having apprehended about 35 people so far https://t.co/OdCFwll3El
— Business Standard (@bsindia) December 26, 2020
सीतापूर, ग्रेटर नोएडा, शाहजहानपूर, आझमगड, मुरादाबाद, मुझफ्फनगर, बिजनौर, कन्नौज, बरेली आणि हरदोई यांठिकाणी हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.