अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी इन्सुली तपासणी नाक्यावर विशेष पथक तैनात
ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क !
सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
गेल्या काही वर्षांत प्रथमच जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पथकात देवगड आणि मालवण येथील अमली पदार्थ तपासणीसाठी विशेष कामगिरी केलेल्या ‘ब्राव्हो’ या श्वानाचा समावेश करण्यात आला आहे. (ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याची वाहतूक, अमली पदार्थांची अवैध वाहतूक होते, तर हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी पूजेची मंगलमय सिद्धता केली जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक)
अमली पदार्थ सेवन केलेला पर्यटक पोलिसांच्या कह्यात
सावंतवाडी – गोव्यातून एका चारचाकी गाडीतून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यासमवेत असलेल्या एका विदेशी पर्यटकाला सावंतवाडी-आंबोली मार्गावरील माडखोल, तांबळवाडी येथे गाडीतून फेकल्याची घटना घडली आहे. या पर्यटकाने अमली पदार्थांचे सेवन केले असून त्याच्यावळ असलेल्या पिशवीत अमली पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अमली पदार्थ सेवन केलेल्या पर्यटकाला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कह्यात दिले.