सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना
विविध पोलीस ठाण्यांमध्ये वर्षभरात ८ घटनांची नोंद
चित्रपटात दाखवण्यात येणार्या प्रेमप्रकरणांचा हा विपरीत परिणाम आहे !
मडगाव, २६ डिसेंबर (वार्ता.) – सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे विशेषत: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. या ८ प्रकरणांमधील ६ घटनांचा पोलिसांनी छडा लावला आहे, तर उर्वरित २ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण चालू असलेली प्रकरणे चालू मासातच नोंद झाली आहेत.
सासष्टी तालुक्यात मडगाव, मायणा-कुडतरी, फातोर्डा आणि कुंकळ्ळी पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ प्रकरणे नोंद झाली आहेत. तालुक्यातील कोलवा पोलीस ठाण्यात अशा स्वरूपाचा एकही गुन्हा नोंद झालेला नाही. अन्वेषणातून मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक प्रकरणांमध्ये पीडित शाळकरी युवती आहे. काही घटनांमध्ये युवतीच्या संगनमतानेच अपहरण करण्यात आले आणि युवती अन् अपहरणकर्ता दोघेही लग्न करून परतले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१९ मधील पहिल्या ९ मासांमध्ये दक्षिण गोवा पोलिसांकडे अपहरणाची एकूण १८ प्रकरणे नोंद झाली आहेत आणि यामधील १४ प्रकरणांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.