खालची रेवंडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा तोडणार्‍यांवर कारवाई करा ! – रेवंडी ग्रामपंचायतीची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – तालुक्यातील खालची रेवंडी येथील खाडी आणि समुद्र यांच्या पाण्यापासून भूमीची धूप होऊ नये, यासाठी मालवण पतन विभागाने बांधलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडून, तसेच त्या ठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी म्हटले आहे की, खालची रेवंडी येथील खाडी किनारी असलेला धूपप्रतिबंधक संरक्षक बंधारा सुदेश दत्तात्रय कांबळी आणि रसिक कुर्‍हाडे या २ व्यक्तींनी पतन विभाग आणि ग्रामपंचायत यांना कोणतीही कल्पना न देता तोडला असून तेथील कांदळवनातील झाडेही तोडली आहेत. (अशा प्रकारे मोठी पर्यावरणीय हानी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आवश्यक ! – संपादक)