हरमल समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थासहित आणखी एक नायजेरियी नागरिक कह्यात

कोरोना-१९ महामारीतही अमली पदार्थांचा व्यवसाय तेजीत चालणारा गोवा !

पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाने २६ डिसेंबर या दिवशी एका छाप्यात हरमल येथे इमेका डेनियल या नायजेरियी नागरिकाला ७ लाख ६० सहस्र रुपयांच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले. त्याच्याकडे ३१.०१ ग्रॅम कोकेन आणि ४.४४ ग्रॅम एल्.एस्.डी. हे अमली पदार्थ आढळले. यापूर्वी २४ डिसेंबरच्या रात्री हरमल समुद्रकिनार्‍यावर एका नायजेरियी नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आले होते.