देवगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्या युवकाला अटक
जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे युवा पिढी अशा प्रकारे नीतीमत्ताहीन झाली आहे ! या घटना थांबवण्यासाठी कायदेशीर कारवाईसह साधना शिकवणे आवश्यक !
देवगड – तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय मुलाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना २४ डिसेंबरला घडल्याचे उघडकीस आले. याविषयी देवगड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून संबंधित आरोपीस अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त समजताच अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.