नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट नाही ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – नजिकच्या काळात मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मंत्रीमंडळात फेरपालट होणार, अशा प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांना अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळात फेरपालट होणार असे मी कधीही म्हटले नाही.’’