कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे सभा घेण्यास राज्यशासनाची बंदी
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्यशासनाने बंदी घातली आहे. यासह स्तंभाच्या ठिकाणी प्रवेशावर, तसेच पुस्तक, खाद्यपदार्थ आणि अन्य कक्ष उभारणे यांवरही निर्बंध घालण्याची सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ जानेवारी या दिवशी कोरेगाव भीमा येथे पेपणे फाटा येथील स्तंभाच्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात येतो; मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. हा कार्यक्रम साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.