बेती (गोवा) येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवीचा जत्रोत्सव
गोव्यातील बेती गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण हिचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. ती नवसाला पावणारी देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीचा वार्षिक पालखी उत्सवाचा आणि जत्रोत्सवाचा (कालोत्सव) रविवार, २७ डिसेंबर २०२० हा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने देवस्थानची माहिती आपण थोडक्यात पाहूया.
संकलक : श्री. देवीदास गावकर, पर्वरी, गोवा.
देवस्थानचा इतिहास
श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवस्थानचा इतिहास फार जुना आहे. पोर्तुगिजांची राजवट गोव्यात येण्याअगोदर देवीचे मंदिर बार्देश तालुक्यातील पिळर्ण या गावी होते. बाटावाबाटीच्या काळात हे मंदिर डिचोली तालुक्यात हालवण्यात आले. नार्वे येथे श्री सप्तेश्वरकोटी देवाच्या सान्निध्यात या मंदिराची स्थापना झाली. नार्वे येेथे श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण पंचायतन स्थापन झाले. कालांतराने बेती ग्रामस्थांच्या पुढाकाराने १९५७ या वर्षी बेती गावात श्री शांतादुर्गा देवस्थानची पुनःर्स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे देवीने ‘तिची बेती गावात स्थापना करावी’, असा स्वप्नदृष्टांंत कै. विठ्ठलराव साळगावकर यांना दिला. त्यानंतर येथे बंद पडलेला कालोत्सव चालू झाला. १९९७ या वर्षी अक्षय तृतीयेच्या शुभमुहुर्तावर येथील भक्तगणांनी एकत्र येऊन बेती गावच्या डोंगरमाथ्यावर आल्त-बेती येथे या मंदिराची उभारणी केली.
कार्यक्रम
रविवार, २७ डिसेंबर या दिवशी सकाळी श्री पंचायतनास अभिषेक, दुपारी महाआरती, फळे आणि श्रीफळ यांची पावणी, दुपारी महाप्रसाद आणि ब्राह्मण समाराधना, असा कार्यक्रम होणार आहे.
विज्ञापनदाते, वाचक, हितचिंतक आणि भाविक या सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो अन् हिंदु राष्ट्राची स्थापना होवो, अशी श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवीच्या चरणी प्रार्थना !