‘सुभद्रा लोकल एरिया’ बँकेची केंद्र सरकारकडे असलेली १६ कोटी रुपयांची गुंतवणूक सुरक्षित
कोल्हापूर – रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत. ठेवीदारांच्या ठेवीही त्यांना परत मिळणार असून त्यासाठी त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. या कारवाईमुळे बँकेत काम करणार्या १२७ कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात एकूण ४ लोकल एरिया बँक कार्यरत होत्या. यातील कॅपिटल, तमिळनाडू आणि पंजाब येथील तीन बँकांचे परवाने यापूर्वीच रहित करण्यात आले असून सुभद्रा ही गेल्या ५ वर्षांपासून एकमेव लोकल एरिया बँक कार्यरत होती. सुभद्राच्या महाराष्ट्रात ११ आणि कर्नाटकात १ अशा १२ शाखा कार्यरत होत्या. सुभद्रावरील कारवाईमुळे देशात आता एकही कॅपिटल बँक शिल्लक राहिलेली नाही.