पंजाबमध्ये संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करणार्या खलिस्तानवाद्यांना ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका
भारतात कुणीही येऊन भारतीय नागरिकाची हत्या करून पुन्हा पसार होतो, हे भारताला लज्जास्पद !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या द वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी तिघा खालिस्तान समर्थकांना अटक केली आहे. त्यांच्यावर वर्ष २००९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रुल्दा सिंह यांच्या हत्येचा आरोप आहे. अटकेतील आरोपी गुरशरणबीरसिंह वहीवाला, अमृतबीरसिंह वहीवाला आणि प्यारासिंह गिल हे तिघेही ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
१. रुल्दा सिंह यांची पंजाबच्या पतियाळामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते संघाच्या ‘राष्ट्रीय शीख संगत’शी संबंधित होते. विदेशांत रहाणार्या शिखांना ते परत भारतात येण्यासाठी आवाहन करत असत. त्यांच्या हत्येसाठी गुरशरणबीरसिंह वहीवाला आणि प्यारासिंह गिल भारतात आले होते. गुरशरणबीर त्याचा भाऊ अमृतबीरसिंह वहीवाला याच्या पारपत्रावरून भारतात आला होता.
२. संघाचे आणखी एक नेते ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांच्या हत्येमध्येही गुरशरणबीरसिंह हा आरोपी आहे. वर्ष २०१६ मध्ये जालंधर येथे गगनेजा यांची हत्या करण्यात आली होती. (पंजाबमध्ये खलिस्तानी हिंदूंना लक्ष्य करून त्यांना ठार करत आहेत, हे पहाता सरकारने आता हिंदूच्या रक्षणासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे ! – संपादक)