विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. मी शोधलेले जप गेल्या एक वर्षापासून साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. ते ते विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत.

१. पाळीचे त्रास दूर होण्यासाठी नामजप

‘श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गुरुदेव दत्त ।’

काही साधिकांना पाळी नियमित येत नव्हती, तर काही साधिकांना ५ दिवसांनी पाळीचा रक्तस्त्राव बंद होण्याऐवजी तो पुढे चालूच रहायचा. या पाळीच्या त्रासांवर मी वरील जप शोधून काढला आणि तो नामजप मी त्या साधिकांना पाळीच्या संभाव्य दिनांकाच्या ४ दिवस अगोदरपासून पाळी संपेपर्यंत प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. हा जप करतांना त्यांना मी उजव्या हाताच्या पाचही बोटांची टोके एकत्र जुळवून त्यांचा आज्ञाचक्रावर न्यास करण्यास सांगितला. न्यास करतांना तो शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावर करण्यास सांगितला. या जपाचा त्या साधिकांना चांगला लाभ झाला.

२. मधुमेहावर नामजप

‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री हनुमते नमः ।’

एका साधिकेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ‘इन्सुलिन’चे (रक्तातील साखरेचे प्रमाण अल्प करणारे औषध) प्रमाण वाढवले, तरी वाढलेलेच असायचे. मी त्यांना वरील जप करण्यास सांगितला. त्यांनी तो जप करण्यास आरंभ केल्यावर आठवडाभरातच डॉक्टरांना ‘औषधात पालट करून पहावा’, असे सुचले. तो पालट केल्यावर त्या साधिकेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण थोडे आटोक्यात आले.

३. पायांपासून सर्व शरिरावर अचानक आलेल्या फोडांवर नामजप

‘श्री हनुमते नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री हनुमते नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – ॐ नमः शिवाय ।’

वाराणसीतील एका साधिकेच्या सर्व शरिरावर अचानक फोड आले होते. ४.११.२०२० या दिवशी त्यांना वरील जप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. आठ दिवसांनी त्या साधिकेेने सांगितले, ‘या जपामुळे आधी जी त्वचा खडबडीत झाली होती, ती जपाला आरंभ केल्यावर २ दिवसांतच मऊ पडू लागली, तसेच फोड वाळू लागले. खाज सुटण्याचे प्रमाण न्यून झाले. आठ दिवसांत शरिरावरील फोडांचा आकार पुष्कळ न्यून झाला आणि त्यांचा रंग फिकटही झाला.’ आणखी ८ दिवसांनी त्यांची त्वचा आणखी मऊ झाली आणि फोडांचे प्रमाण आणखी न्यून झाले.

४. त्वचेवर झालेल्या बुरशीजन्य संसर्गासाठी (फंगल इनफेक्शन) नामजप

‘श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री हनुमते नमः – श्री हनुमते नमः ।’

एका साधिकेची कंबर आणि जांघा येथे बुरशीजन्य संसर्ग झाला होता. तिची तेथील त्वचा जाड आणि काळसर झाली होती. तिने वरील जप १५ दिवस प्रतिदिन १ घंटा केल्यावर तिची त्या भागांतील खाज न्यून झाली, तसेच तेथील त्वचेचा काळसरपणा आणि जाडसरपणा पुष्कळ न्यून झाला.

५. रक्तातील ‘क्रिएटिनिन’ वाढल्याने मूत्रपिंडांची क्षमता न्यून होण्याच्या विकारावरील नामजप

‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री हनुमते नमः ।’

६. मूळव्याधीवर नामजप

‘श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – श्री हनुमते नमः – श्री गणेशाय नमः – श्री गणेशाय नमः – ॐ नमः शिवाय ।’

७. मूतखड्यावर नामजप

‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री हनुमते नमः ।’

८. रक्तातील लोहाचे न्यून झालेले प्रमाण वाढण्यासाठी नामजप

‘श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्रीराम जयराम जय जय राम ।’

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्‍या अनुभूती साधकांनी sankalak.goa@gmail.com या इ-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता कळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.१२.२०२०)