हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे तिहार कारागृह परिसरातून अपहरण
|
|
नवी देहली – हत्येच्या प्रकरणी पसार असणार्या आणि न्याय दंडाधिकार्यांसमोर शरण येण्यासाठी तिहार कारागृहात गेलेल्या आरोपीचे या कारागृहाच्या परिसरातून दिवसाढवळ्या अपहरण केल्याची घटना घडली. या वेळी त्याच्या अधिवक्त्यालाही मारहाण करण्यात आली. काही पोलीस आणि अन्य २-३ जणांनी कारागृह परिसरात घुसून आरोपीला मारहाण केली आणि त्याला पळवून नेले. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि चौकशी अधिकारी यांना याविषयी जाब विचारला. तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांना आरोपीविषयी माहिती सादर करण्याचा आदेश दिला.
तिहाड़ जेल से मर्डरर का हो गया अपहरण। प्रशासन में मचा हड़कंप।#tiharjail https://t.co/9Sho90ctlP
— Newstrack (@newstrackmedia) December 26, 2020
न्यायालयाने आरोपी कार्तिक उपाख्य माधव याला कारागृहातील दंडाधिकार्यांसमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार तो त्याचे अधिवक्ता अन्वर अहमद खान यांच्यासह तेथे गेला असता ही घटना घडली.
प्रवेशद्वार क्रमांक १ वर घडलेल्या या घटनेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचा रणवेश कुमार, गृहरक्षक दलाचा भागीरथ, पोलीस शिपाई दत्तू मोरे यांची चौकशी करण्यात येत आहे.