ऑनलाईन कर्ज देऊन फसवणूक करणार्या चौघांना अटक
एका चिनी नागरिकाचा समावेश
चिनी नागरिकांची अशी गुन्हेगारी पहाता भारतीय यंत्रणा निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सायबराबाद पोलिसांनी ऑनलाईन कर्ज देण्याच्या प्रकरणी फसवणूक केल्यावरून ४ जणांना अटक केली असून यात एका चिनी नागरिकाचा समावेश आहे. ते ४२ प्रकारच्या अॅप्सद्वारे लोकांची फसवणूक करत होते.
Instant #loan Apps #fraud gang busted in #Hyderabad; 4 members, including a #Chinese national arrested.https://t.co/ZvPQR1QCfZ
— Zee News English (@ZeeNewsEnglish) December 25, 2020
हे आरोपी कर्ज फेडू न शकणार्यांना खोटी कायदेशीर नोटीस पाठवणे, धमक्या देणे आदी त्रास देत होते. या टोळीचा प्रमुख जिया झांग असून तो सध्या सिंगापूरमध्ये आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चिनी नागरिक यी बाई उपाख्य डेनिस, सत्यपाल, अनिरुद्ध मल्होत्रा आणि रिची हेमंत सेठ यांचा समावेश आहे. अन्य दोघे जिया झांग आणि उमापती उपाख्य अजय पसार आहेत.