नववर्षांनिमित्त एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री
मायकल लोबो यांच्या सांगण्याप्रमाणे गोव्यातील ख्रिस्ती समाजाने त्यांच्या मूळ संस्कृतीनुसार आचरण केल्यास त्यांना लाभच होईल !
म्हापसा – नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष यांनिमित्त एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणावे, असे आवाहन बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी केले आहे.
मंत्री मायकल लोबो पुढे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिवसाची किंवा रात्रीची संचारबंदी लादली जाणार नाही; मात्र प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे. राज्यात भेट देणार्या प्रत्येक पर्यटकाने मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे अत्यावश्यक आहे. कोरोना महामारीमुळे ‘सनबर्न’सारखा मोठा महोत्सव आम्ही रहित केला आहे; मात्र पर्यटकांसाठी लहान कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य आहे. गोवा हे एक पर्यटनस्थळ आहे.’’