वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अजीज इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
बीड – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कह्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती अजीज इस्माईल तथा मंगलदादा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगलदादा शेख हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ते आहेत. पोलीस शेख यांचा कसून शोध घेत असून ते पोलिसांच्या तावडीतून निसटले; मात्र त्यांचे अन्य सहकारी पिंटू काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर आणि मुतजीन मुनीर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
सौजन्य : TV9 Marathi
वैद्यनाथ साखर कारखान्यातील ‘स्टोअर’ गोदाम आणि ‘वर्कशॉप’ गोदाम येथून संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरिअल, बिअरिंग, ब्रास मटेरिअल, बुश राऊंड, असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. या साहित्याची किंमत अनुमाने ३७ लाख ९४ सहस्र ९१४ एवढी होती.