मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जीवरक्षकांचा संप मागे
पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीवरक्षकांना ‘गोवा मानव संसाधन विकास महामंडळा’च्या माध्यमातून सरकारी सेवेत रूजू करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर येथील आझाद मैदानात गेले एक मास आंदोलन करणार्या जीवरक्षकांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. सरकारी सेवेत रूजू करण्याच्या मागणीवरून जीवरक्षकांनी आंदोलन छेडले होते.