एळवटी, एकोशी येथे आज श्री सत्यनारायण पूजा

एळवटी, एकोशी येथे ८९ वर्षांपूवी गुरांच्या रोगाची साथ आली होती. त्यामुळे गुरे- ढोरे मरत होती. तेव्हा ग्रामस्थांनी मुळगाव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी रवळनाथ देवस्थानात जाऊन प्रसाद घेतला. त्या वेळी देवाने श्री सत्यनारायण पूजा करायला सांगितली आणि तेव्हापासून या पूजेला आरंभ झाला. या पूजेला ‘गुरांची पूजा’, असे म्हणतात. त्यानंतर गुराढोरांना लागलेल्या रोगांचे निवारण झाले. या पूजेसाठी लागणारी भूमी कै. जयवंत शिरोडकर यांनी दान केली. ही पूजा करण्यामागे कै. जयवंत शिरोडकर, कै. रामनाथ शेट शिरोडकर, कै. रंगा शेट शिरोडकर, कै. सखाराम शेट शिराडकर, कै. कृष्णा शेट शिरोडकर, कै. चंद्रू करापूरमकर या सर्वांचा हातभार लागला.

यंदा पूजा दुपारी २ वाजता चालू होणार आहे. त्यानंतर दुपारी कीर्तन होणार आहे. या पूजेला आजूबाजूच्या गावांतील अनेक भाविक उपस्थित रहातात.

प्रार्थना : हे भगवंता,  पूजाविधीद्वारे माझ्यात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.