कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी राज्याच्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी या दिवशी होणार्या अभिवादन कार्यक्रमासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जाहीर सभा, खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे कक्ष लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे सूचवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे समर्थन विविध संघटनांनी केले असून नागरिकांनी विजयस्तंभाला घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केले आहे.