संतकवी दासगणु महाराज शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष असतांनाचे पावित्र्य मंदिर सरकारीकरणानंतर लयाला जाणे
पूर्वी शिर्डी देवस्थान सरकारच्या कह्यात नव्हते. त्या काळी संतकवी दासगणु महाराज त्या मंदिराचे ४० वर्षे अध्यक्ष होते. ते गावोगाव कीर्तने करून पैसा गोळा करून आणायचे आणि रामनवमीचा उत्सव करायचे. इतके ते देवस्थान गरीब होते. दासगणु महाराजांसारखा संत पुरुष अध्यक्ष असल्याने देवस्थानचे पावित्र्य उच्च दर्जाचे होते आणि कारभार अत्यंत स्वच्छ होता. सरकार नियुक्त विश्वस्त आले, पुढारी त्यात घुसले आणि त्या संस्थानचे पावित्र्य लयाला गेले अन् सर्व स्थिती बिघडली.
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)