पिंपरी येथील ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकाकडून रुग्ण तरुणीचा विनयभंग
अशा वासनांधाना कठोर शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत !
पिंपरी चिंचवड – येथील महानगरपालिकेच्या ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये ‘मी पोलीस आहे’ असे म्हणत सुरक्षा रक्षकाने रुग्ण तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल मारुती स्वामी या कंत्राटी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईत अशीच घटना घडली असतांना काही घंट्यातच राज्यातील हा दुसरा विनयभंगाचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालतील महिला सुरक्षेसह अन्य प्रश्नही निर्माण झाले आहेत.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. या कामाचे टेंडर कुणाला मिळावे यासाठीही अनेक नेते आमने सामने आले होते. त्यानंतर मर्जीतील ठेकेदाराला हे कंत्राट मिळवून दिल्याचीही चर्चा आहे. (महिलांवरील वाढते अत्याचारांचे प्रमाण पहाता महिलांनी स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते ! – संपादक )