अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पाटण (जिल्हा सातारा) येथील राष्ट्रवादी काँग्रसच्या नगरसेवकांना अटक : एक दिवसाची पोलीस कोठडी
सातारा, २५ डिसेंबर (वार्ता.) – प्रेस नावाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर २५ डिसेंबर या दिवशी अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्यामुळे पाटण (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी पाटण पोलिसांनी कुंभार यांना अटक केली. न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
पाटणमधील अनेक मान्यवर व्यक्ती आणि महिला या ‘व्हॉट्सॲप’ गटाच्या सदस्य आहेत. त्यामुळे याच गटातील सदस्य महेंद्र चव्हाण यांनी पाटण पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी नगरसेवक कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती. गुन्हा नोंद झाल्यानंतर कुंभार फरार झाले होते. नंतर पाटण पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली.