‘ॲमेझॉन’च्या कामात अडथळा न आणण्याचे न्यायालयाचे मनसेला निर्देश
मुंबई – ‘ॲमेझॉन’ आस्थापन आणि त्यांचे कर्मचारी यांना त्यांचे काम करण्यापासून कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, असे निर्देश दिंडोशी दिवाणी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला दिले आहेत. याविषयी १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
‘ॲप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, यासाठी मनसेकडून दबाव आणला जात असल्याविषयी ‘ॲमेझॉन’कडून दिंडोशी दिवाणी न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. यावर २४ डिसेंबर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने वरील निर्देश दिले. या प्रकरणी न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य पदाधिकारी यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे.