१ जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद रहाणार !
पुणे – १ जानेवारी या दिवशी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० या दिवशी सायंकाळी ५ ते १ जानेवारी २०२१ या दिवशी रात्री १२ पर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशा दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.