‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थाे दासगुप्ता यांना अटक
मुंबई – पैसे देऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने २४ डिसेंबर या दिवशी ‘भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) या संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना रायगड येथून अटक केली. यापूर्वी ‘भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोमिल रामगडिया यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.