यवतमाळ पोलिसांकडून ५०० पेट्या मद्यसाठा जप्त !
यवतमाळ, २५ डिसेंबर ( वार्ता.) – संभाजीनगरच्या रेडीको डिसलेरी या आस्थापनातून ट्रकने आलेला ५०० पेट्या मद्यसाठा शहरातील धामणगाव मार्गावर शहर पोलिसांनी पकडून जप्त केला असून चालक फरार झाला आहे. या पेट्या विदेशी मद्याच्या असून त्याची किंमत ३६ लक्ष रुपये आहे. जिल्ह्यालगत मद्यबंदी असलेल्या चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात ट्रक जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संभाजीनगरपासून जालना, बुलढाणा, वाशीम हे ३ जिल्हे येत असून हा ट्रक पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यात आला असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमात आहे. पुढील कारवाई शहर पोलीस ठाणे करीत आहे.