चीनकडून मणिपूरमधील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षण
नवी देहली – गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते. याच वर्षी जुलै मासामध्ये मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आसाम रायफल्सचे १८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ४ जण घायाळ झाले होते.
मणिपुर के आतंकी संगठनों को पहुंचाए गए चीनी हथियार#Manipur #China #RPF https://t.co/W0uJmtFYOH
— Zee News (@ZeeNews) December 25, 2020
त्यानंतर भारतीय सैन्याने म्यानमारमधील या आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईकही केला होता. सध्या म्यानमारमध्ये भारताच्या सीमेजवळ या आतंकवादी संघटनांचे तळ कार्यरत असून तेथे चीनकडून शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे.