मुंबई येथे भररस्त्यात दुचाकीस्वराला जाणीवपूर्वक धडक देणार्या धर्मांध रिक्शाचालकाला अटक
राज्यकर्त्यांच्या लागुंलचालनामुळे मुजोर झालेले धर्मांध !
मुंबई – घाटकोपर येथे दुचाकीस्वाराला भररस्त्यात जाणीवपूर्वक धडक देऊन पसार झालेल्या धर्मांध रिक्शाचालकाला पोलिसांनी अटक केले आहे. सलमान सय्यद असे या रिक्शाचालकाचे नाव आहे. सय्यद याने दुचाकीला इतक्या अमानुषपणे धडक दिली की, यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव होता. एका चारचाकी गाडीच्या कॅमेर्यामध्ये हे दृश्य टिपले गेले. त्यामुळे पोलिसांना आरोपीला अटक करता आले.
१७ डिसेंबर या दिवशी घाटकोपर येथील किशोर कर्डक दुचाकीवरून जात होते. त्या वेळी सिग्नलवर गाडी थांबवली असतांना मागून वेगाने येणार्या सलमान सय्यद याने त्यांच्या पायावरून गाडी नेली. सिग्नल संपल्यावर किशोर यांनी सय्यद याला गाठले आणि जाब विचारला. या वेळी दोघांचा वाद झाला. याचा राग धरून सय्यद याने किशोर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे किशोर गाडीवरून खाली कोसळले. त्या वेळी सुदैवाने मागून कोणतीही भरधाव गाडी येत नसल्यामुळे किशोर यांचा प्राण वाचला. याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर देवनार पोलिसांनी दुचाकीस्वार आणि रिक्शाचालक यांचा शोध घेऊन रफिकनगरमधून सलमान सय्यद याला कह्यात घेतले, तसेच किशोर कर्डक यांना संपर्क करून गुन्हा नोंदवण्यास बोलावले. पोलिसांनी सय्यद याची रिक्शाही कह्यात घेतली आहे. (अशी कर्तव्यदक्षता समाजामध्ये पोलिसांविषयी विश्वासाहर्ता निर्माण करणारी आहे. तत्परतेने आणि स्वत:हून गुन्हेगाराचा शोध घेऊन शिक्षा करणार्या देवनार पोलिसांचा आदर्श सर्वत्रच्या पोलिसांनी घ्यावा. – संपादक)