मुंबईमध्ये धावत्या रेल्वेतून ढकलून युवतीला ठार मारण्याचा प्रयत्न, बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद
महिलांवरील अत्याचार रोखता न येणे हे राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद होय. युवतींनो स्वत:चे रक्षण करण्यासाठी आता स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !
मुंबई – एका २५ वर्षीय युवतीला धावत्या लोकलगाडीतून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. २२ डिसेंबर या दिवशी वाशी खाडीच्या पुलाच्या येथे रेल्वेमार्गाजवळ ही युवती घायाळ अवस्थेत आढळली. प्राथमिक पडताळणीत युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले असून पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
ही युवती टिळवाला येथे रहाणारी असून पवई येथे घरकाम करण्यासाठी जात असे. पहाटे ६ वाजता वाशी खाडी पुलाच्या रेल्वेमार्गाजवळ मोटरमनला ही युवती घायाळ अवस्थेत आढळली. त्यानंतर पोलिसांनी युवतीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तिच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार चालू असून प्रकृती स्थिर आहे.